More
    Homeराजकारणमहाविकास आघाडी बंडखोरीचे ग्रहण 

    महाविकास आघाडी बंडखोरीचे ग्रहण 

    लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे , उमेदवारांचे प्रचार सभा देखील सुरु झाल्या मात्र महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अजून सुटता सुटेना असेच दिसत आहे . राज्यात महाविकास आघाडीकडून सर्व ४८ जागांचे वाटप जाहीर झाले आहे. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा वाद बंडखोरीचे ग्रहण पसरवण्याची भीती दर्शवित आहे . सांगलीमधील जागेवरुन काँग्रेस ( cogress) आणि शिवसेनेत ( shivsena ) सुरु असलेला वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाही . महाविकास आघाडीने सांगलीची (Sangli) जागा अधिकृतरीत्या शिवसेनेला (shivsena) सोडण्यात आल्याची घोषणा केली आहे.मात्र, अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे सांगलीत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेस बहिष्कार (Congress) टाकला आहे.


    मेळाव्याला काँग्रेस नेत्यांनी पाठ
    जागावाटपाच्या वादामुळे सोमवारी सांगलीत (sangali) झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली. सांगलीत काँग्रेस नेते विशाल पाटील ( vishal patil) लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी अपक्ष बरोबरच दुसरा अर्ज काँग्रेस पक्षातर्फेही दाखल करणार आहे. सांगलीत काँग्रेस भवन समोर मेळाव्याच्या निमित्ताने विशाल पाटील ( vishal patil) शक्तिप्रदर्शन करणार आहेत. गणपती मंदिरासमोरून पदयात्रा काढून काँग्रेस भवनासमोर मेळावा होणार आहे. या मेळाव्यास जतमधील भाजपाचे नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप ( vilasrao jagtap ) येणार आहेत. या मेळाव्याला विशाल पाटील ( vishal patil ) यांच्या व्यासपीठावर कोणकोण उपस्थित राहणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच महाविकास आघाडी नेत्यांचे आजच्या विशाल पाटील ( vishal patil ) यांच्या शक्ती प्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे.

    बैठकीत देखील तोडगा निघाला नाही 
    सांगली जिल्ह्यातील युवा नेते विश्वजीत कदम,( vishjeet kadam) आमदार विक्रम सावंत ( vikram sawant) आणि पृथ्वीराज पाटील (puthviraj patil) यांनाही नागपूरला ( nagpur)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) आणि बाळासाहेब थोरात ( balasaheb thorat) यांनी तातडीने बैठकीला बोलावले होते. त्या बैठकीनंतर अजून तोडगा निघाला नाही. त्यासंदर्भात निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाही. आता काँग्रेस नेते विशाल पाटील (vishal patil) यांच्या शक्ती प्रदर्शनात कोण सहभागी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणातून माघार न घेण्याचा विशाल पाटील (vishal patil) समर्थकांनी निर्धार व्यक्त केला आहे.

    सांगली लोकसभा मतदार संघ
    हा तसा काँग्रेसचा पर्यायाने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (vasantdada patil) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा गड नेस्तनाबूत करीत भाजपने (bjp) या ठिकाणी विजयी पताका खासदार संजयकाका पाटील (sanjaykaka patil) यांच्या माध्यमातून रोवली. ही विजयाची परंपरा 2019 मध्ये कायम राखत पाटील यांना पुन्हा संधी मिळाली. मात्र, यावेळी त्यांच्या विरोधात निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय वसंतदादा घराण्यातून लवकर झाला नाही. या दिरंगाईमध्ये विकास आघाडीने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. स्वाभिमानीने काँग्रेसकडूनच विशाल पाटील (vishal patil) यांच्या उसन्या उमेदवारीवर ही निवडणूक लढवली. 2019 मध्ये बहुजन वंचित आघाडीच्यावतीने आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padlkar) हे मैदानात उतरले होते. भाजप विरोधातील मतदान आघाडीच्या उमेदवाराकडे वळू नये याचा फटका भाजपला बसू शकतो याची जाणीव भाजप नेतृत्वाला होती. यामुळे बहुजन वंचित आघाडीचे पडळकर यांनी तिसर्या क्रमांकाची मते घेतली. याचा फटका आघाडीच्या उमेदवारांला म्हणजे विशाल पाटील (vishal patil) यांना बसला. परिणामी भाजपचा विजय झाला


    सांगली मतदारसंघाचा नेमका तिढा काय? 
    सांगली मतदारसंघासाठीचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर काँग्रेस (congress) आणि ठाकरेंची शिवसेना (shivsena) या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. कोल्हापुराच्या बदल्यात सांगली ही जागा आमच्याकडे असेल अशी शिवसेनेची भूमिका आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून चंद्रहार पाटील (chandrhar patil) यांना येथे उमेदवारी दिली जाईल असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सांगली (sangali) ही जागा आमच्याकडेच राहावी अशी काँग्रेसची मागणी आहे.सांगली हा काँंग्रेसचा बालेकिल्ला असून कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसनेच लढवावी आणि लोकसभेसाठी विशाल पाटील (vishal patil) हेच उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत (mumbai) झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आली होती. सांगली मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून 2014 चा अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेचाच विजय झाला आहे. 2019 मध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने पराभव पदरी आला असून मतदानामध्ये ताकद दिसली आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेस कडेच राहिली पाहिजे असा आग्रही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता धरायला सुरुवात केलीय. 

    त्यामुळे नेमके सांगली मतदार संघात काय होणार? हे पाहणे महत्त्वाची ठरणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img