More

    पंतप्रधान नरेंद्र मोदी साकारणार पुढील २५ वर्षांतील भारत 

    लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांची घोषणा, अर्ज दाखल करण्याची धावपळ, बंडखोरी, प्रचारसभा, नाराजीनाट्य, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशा सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तयार झालेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीची रणधुमाळीत चर्चा सुरू आहे. या मुलाखतीमुळे पुढील २५ वर्षांचे विकासाचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवून काम करणाऱ्या एका दूरदृष्टी नेतृत्वाची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पाहायला मिळाली, तर या लेखात जाणून घेऊयात पुढील २५ वर्षात भाजपचा सरकारात कसा असे भारत !


    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डीडी न्यूज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपला देशाच्या विकासासाठी पुढच्या २५ वर्षांचा प्लॅन तयार आहे असे सांगितले आहे. १८व्या लोकसभा निवडणुकीपूर्वी,पुढील २५ वर्षात देशाला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. २०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा विकसित देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या १०० दिवसांच्या रोडमॅपवर चर्चा करताना सांगितले की त्यांनी पुढील २५ वर्षांसाठी भारताची रणनीती तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली आहे. २०४७ विकसित भारत प्रकल्पावर गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे आणि त्यांनी पदावर निवडून आल्यास त्यांच्या पुढील कार्यकाळात पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळाचे लक्ष्य देखील ठेवले आहे.१०० दिवसांच्या रोडमॅपचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेवर भाष्य करताना, त्यांनी टिपणी केली की गेल्या दोन वर्षांत, त्यांनी देशभरातील लोकांची मते आणि २०४७ मधील भारताबद्दलची त्यांची मते मिळवली आहेत. “मी १५ लाखांहून अधिक लोकांचे निवेदन घेतले आहेत.त्यांना येत्या २५ वर्षात भारत कसा पहायचा आहे, मी विविध एनजीओशी संपर्क साधला आणि १५-२० लाख लोकांनी त्यांचे अहवाल दिले आणि मी एक समर्पित टीम बनवली प्रत्येक विभागातील अधिकारी हे २५ वर्षांपर्यंत कसे काम करू शकतात आणि मग मी त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांनी दोन ते अडीच तास प्रेझेंटेशन दिले. पूर्वीची राजकीय संस्कृती कुटुंब मजबूत कसे बनवायचे, कुटुंबाची मुळे कोणाला कशी हिरावून घेऊ द्यायची नाही यावर होती. आतापर्यंत झालेला विकास हा केवळ ट्रेलर होता. आगामी काळात आणखी महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. तसेच देशाच्या समोर एक संधी आहे. काँग्रेस सरकारचे पाच-सहा दशकांचे काम आणि माझे फक्त १० वर्षांचे आहे. ५ ते ६ दशके मिळूनही काँग्रेस देशातील गरिबी हटवू शकले नाहीत. देशाच्या भक्कमतेसाठी काम करत आहे. देशातील विविधता हीच शक्ती असल्याची जाणीव आम्हाला आहे. काँग्रेसच्या ५० वर्षांतील कामापेक्षा मागील १० वर्षांतील कामगिरी सरस आहे. कोणत्याही क्षेत्रांबद्दल दोन्ही सरकारमधील कामाची तुलना करावी, असे आवाहन मोदींनी मतदारांना केले आहे.

    विकसित देशांच्या श्रेणीत भारत येणार

    आकडेवारीनुसार, देशाची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ३०ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. सध्या, ३. ७ ट्रिलियन डॉलरच्या GDP सह ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.जागतिक बँकेच्या मते, जर एखाद्या देशाचे दरडोई उत्पन्न १२,००० डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे वार्षिक १० लाख रुपये असेल, तर तो देश उच्च उत्पन्नाची अर्थव्यवस्था म्हणजेच विकसित अर्थव्यवस्था मानला जातो. जागतिक रेटिंग एजन्सी S&P च्या मते, भारताचा GDP पुढील ७ वर्षांत ७. ३ ट्रिलियनपर्यंत पोहोचेल. अशाप्रकारे, भारत २०३० पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे. NITI आयोग २०४७ पर्यंत भारताला सुमारे ३० ट्रिलियनची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे. ‘व्हिजन’ दस्तऐवज २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आवश्यक संस्थात्मक, मूलभूत बदल आणि सुधारणांची रूपरेषा दर्शवेल. ‘व्हिजन इंडिया अॅट २०४७ ‘चा मसुदा डिसेंबर २०२३ पर्यंत तयार होईल आणि पुढील तीन महिन्यात तो सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. नीती आयोग मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यामुळं चिंतेत आहे. भारताला गरिबी आणि मध्यम उत्पन्नाचे जाळे फोडायचे असल्याचे आयोगाचे मत आहे. मे २०२३ मध्ये NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले होते. पण विकसित देश झाल्यानंतर भारतीयांच्या कमाईवर काय परिणाम होईल हे तुम्हाला माहीत आहे का? हे समजून घेण्यासाठी जागतिक बँकेची विकसित राष्ट्राची व्याख्या जाणून घेणे आवश्यक आहे.

    भाजप सरकारने केलेल्या विकासकामांची यादी 

    मागील दशकात, लोकांनी नारे नव्हे तर उपाय पाहिले आहेत,सरकारने पूर्वीच्या शासनाद्वारे अनेक दशके कमकुवत मानल्या गेलेल्या लोकांची जबाबदारी घेण्याचे काम केले आहे.ज्यांचे कोणी नाही मोदी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. देशातील जनता आपल्या सरकारच्या कामाची गती आणि प्रमाण पाहत आहे आणि अनुभवत आहे. पुढील दशकापूर्वी, लोक भारताची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनताना पाहतील आणि पक्की घरे, शौचालय, गॅस, वीज, पाणी आणि इंटरनेट यासारख्या मूलभूत गरजा प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिल्या जातील.सध्याचे दशक एक्स्प्रेसवे, हाय-स्पीड ट्रेन्स आणि अंतर्देशीय जलमार्ग यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे असेल यावर त्यांनी भर दिला.या दशकात, भारताला पहिली बुलेट ट्रेन मिळेल, तिचे पूर्णपणे कार्यरत समर्पित फ्रेट कॉरिडॉर आणि मोठी शहरे नमो भारत किंवा मेट्रो रेल्वे नेटवर्कद्वारे जोडली जातील. हे दशक भारताच्या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, गतिशीलता आणि समृद्धीसाठी समर्पित असेल,” पंतप्रधान म्हणाले.या सगळ्यातही जग भारताकडे आत्मविश्वासाचा किरण आणि मजबूत लोकशाही म्हणून पाहते. चांगल्या अर्थकारणाने चांगले राजकारण करता येते हे भारताने सिद्ध केले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

    राम मंदिराचा उल्लेख 

    अयोध्येतील राम मंदिर व्हावे ही गेल्या ५०० वर्षांपासून हिंदुधर्मीयांची आस्थेची भावना होती. हे मंदिर सरकारी पैशातून नाही, तर लोकवर्गणीतून निर्माण झाले आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशातील गोरगरिबांनी पै-पै जमा केले. या मंदिर निर्माणातून चार महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित होतात. एक म्हणजे ५०० वर्षांचा अविरत संघर्ष, दुसरे म्हणजे लांबलचक न्यायिक लढा, तिसरे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि चौथा म्हणजे लोकांनी एक एक पैसा गोळा करून हे मंदिर उभारले गेले. या गोष्टी पुढच्या कैक वर्षांपर्यंत लोकांना प्रेरणा देत राहतील, असे पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून स्पष्ट केले. 

    माझे निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. जनकल्याणासाठी आहे. देशाच्या तरुणांसाठी मी उशिर करु इच्छित नाही. मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. योग्य दिशेने काम करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भरपूर काही आहे, जे मला अजून करायचं आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न पूर्ण कसं होईल, ते मी पाहतो आहे. आतापर्यंत जे झालं ते ट्रेलर आहे, मी भरपूर काही करु इच्छित आहे”, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img