More
    Homeविश्लेषणअयोध्या प्राणप्रतिष्ठेनंतर रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह 

    अयोध्या प्राणप्रतिष्ठेनंतर रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह 

    या वर्षीची रामनवमी एकदम खास आहे .अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभू श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनमवी आहे. हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रामनवमी ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी असते आणि हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी रामनवमीच्या दिवशी दिवसभर रवियोगाचा शुभ योग आहे. राम भक्तांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो. चला तर त्यानिमित्ताने रामनवमीचे महत्त्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त कधी आणि केव्हा आहे ते पाहूया.

     रामनवमी’चे महत्त्व आणि महात्म्य
    त्रेतायुगात चैत्र शुक्ल नवमीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला. राम नवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहेत. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात, मठांत यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. या दिवशी घरी पूजाविधीचे आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहे. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने, माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते.

    ‘रामनवमी’ केव्हा आहे, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
    हिंदू पंचांगानुसार रामनवमी या वर्षी १६ एप्रिलला दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होत आहे. तर रामनवमीचा समारोप ३ वाजून १४ मिनिटांनी होणार आहे. तिथीनुसार आज रामनवमी साजरी होत आहे . आज राम नवमीच्या दिवशी चैत्र नवरात्राचा समारोप ही होत आहे. जे लोक नवरात्रीचा व्रत करत आहेत, त्यांनी रामनवमीचे पारायण करून नवरात्रीचे व्रत पूर्ण करावे. रामनवमीच्या दिवशी पूर्ण दिवस रवी योग साकारत आहे.याच दिवशी आश्लेषा नक्षत्र पूर्ण रात्रीपर्यंत आहे.

    रामनवमी’ पूजेचा शुभ मुहूर्त
    रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत सर्वोत्तम वेळ आहे. तसेच ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंतची वेळही पूजनासाठी घेता येईल.

    रामनगरी फुलांनी सजली
    भारतभूमीला जर खर्या अर्थाने कशाने जोडले असेल, तर ते म्हणजे सनातन संस़्कृतीने! या संस्कृतीची ओेळख म्हणजेच प्रभू श्रीराम होय. प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाण्याची मनोमन इच्छा असते आणि हेच कारण आहे की प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत रामभक्तांची रिघ लागली आहे. देशात पहिल्यांदाच 5 वर्षांच्या रामलल्लांसोबत रामनवमी साजरी करण्यात येत आहे. रामजन्मभूमी रस्ता ते गर्भगृहापर्यंत फुलांच्या माळांची सुरेख सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसर फुलांनी बहरुन गेला आहे. तर रात्रीच्या वेळी चंद्र प्रकाशात लायटिंग हा परिसर उजळून टाकणार आहे. दिव्यांची आरस होणर आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी लाखो भविकांची एकच गर्दी उसळली आहे.या वेळी राम मंदिर परिसरात प्रसिद्ध कलाकार गीत, संगीत आणि भजन सादर करतील. हा परिसर भक्तीरसाने भरुन जाणार आहे. सकाळी 4 वाजेपासूनच भक्तांना रामल्लांचे दर्शन सुरु झाले आहे. रात्री 11 वाजेपर्यंत भक्त डोळे भरुन रामलल्ला बघू शकतील.

    प्रभू श्री रामाचे गुण
    रामनवमीनिमित्त आपण प्रभू रामाच्या या गुणांची आठवण देखील करून घेऊयात ज्यामुळे ते जगभरातील करोडो लोकांसाठी आदर्श बनवतात.
    मैत्री
    प्रभू रामाच्या मैत्रीची चर्चा नेहमी होते. निषादराज, केवत आणि सुग्रीवच नव्हे तर लंकेत राहणारे विभीषणही त्यांचे चांगले मित्र बनले. हा एक गुण आहे जो तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशाचा मार्ग दाखवेल. 
    संयम
    भगवान राम संयमाही शिकवतात. वनवास असो, किंवा समुद्राला लंकेचा मार्ग तयार करणे असो. जीवनात संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे, जे प्रत्येक नात्यात उपयोगी पडते. याखेरीज संयमासह, श्री राम हे देखील शिकवतात की कोणते कार्य प्रेमाने किंवा समजूतदारपणे केले जाऊ शकते आणि कोठे धनुष्य आवश्यक आहे. म्हणून, रागाचा योग्य वापर कसा करायचा आणि अनावश्यक ठिकाणी तो कसा टाळायचा हे देखील जाणून घेतले पाहिजे.
    विद्वता
    श्री राम हे एक महान विद्वान होते आणि त्यांनी चारही वेदांचा अभ्यास केला होता. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षेत्राचे पूर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हालाही चार लोकांमधील कोणत्याही विषयावर ज्ञानाच्या बाबतीत पराभवाला सामोरे जावेसे वाटत नसेल, तर तुमच्या जीवनात गोष्टींचा सखोल अभ्या करण्याचा हा गुण अवश्य अवलंबवा.

    मराठी मूड तर्फ मराठी मूडच्या सर्व वाचकांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img