More
    Homeराजकारणबारामतीत पुतण्या काकाला बाजार दाखवणार?  

    बारामतीत पुतण्या काकाला बाजार दाखवणार?  

    महाराष्ट्रासह देशभरात निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसून येते. तर दुसरीकडे विरोधकांमध्ये वरवर पाहता आघाडी दिसून येत असली तरी अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जाते. मात्र निवडणुकीच्या या रणधुमाळीत महाराष्ट्रचे विशेष लक्ष हे बारामती मतदारसंघा कडे लागले आहे. बारामतीत काका पुतण्याला धूळ चारणार की पुतण्या काकाला बाजार दाखवणार, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे. आणि याला जबाबदार ठरले ते २००४ सालच्या विधानसभा निवडणुकी वेळी शरद पवारांनी केलेले वक्तव्य. 


    तर ही गोष्ट २००४ सालच्या विधानसभा निवडणुक प्रचारा दरम्यानची आहे. पुरंदर विधानसभेच्या जागेवर ‘दादा जाधवराव’ यांच्या रूपाने समाजवादी विचारांशी बांधिलकी असणारा उमेदवार निवडणूक लढवत होते. तर त्यांच्या विरोधात वर्षभरपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अशोक टेकवडे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली होती. त्यावेळी दादा जाधवराव ६९ वर्षांचे होते. १९८० चा अपवाद वगळता १९७८ ते १९९९ असे एकूण पाच वेळा दादा जाधवराव पुरंदर विधानसभेतून निवडून आले होते. मात्र २००४ साली दादांच्या विरोधात पवारांनी कंबर कसली आणि त्यांना पराभूत केले. पण त्यावेळी प्रचाराच्या भाषणादरम्यान पवारांचा तोल सुटला. दादांसारख्या ज्येष्ठ नेत्या विरोधात शेरेबाजी करताना “बैल म्हातारा झाला कि त्याला बाजार दाखवायचा असतो”, असे वक्तव्य केले होते. 


    आज नियतीने ८३ वर्षांच्या शरद पवारांसमोर सख्या पुतण्याला उभे केले आहे. काका आणि पुतण्यासाठी बारामती लोकसभेची जागा प्रतिष्ठेचा विषय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच इतरांची घरे फोडणाऱ्या खुद्द शरद पवारांच्याच घरात फूट पडलेली आहे. ताई विरुद्ध वाहिनी असा जोरदार सामना सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना त्या पवार नाहीत अशा अर्थाचे खळबळ जनक विधान शरद पवारांनी केले होते.बारामती लोकसभेत सुप्रियाताईंचे पानिपत होणार असेही बोलले जाते. अजित दादांनी महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून माढा लोकसभेची जागा दिलेली आहे. त्यामुळे शरद पवार चिंतेत आहेत. शिवाय रायगड, परभणी, बारामती, शिरूर, धाराशिव या ठिकाणी पक्षातर्फे उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याकडे दादांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे २००४ साली शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे “म्हाताऱ्या झालेल्या बैलाला अजित दादा निश्चितच बाजार दाखवणार” ,असे दादांचे कट्टर समर्थक म्हणू लागलेत.  

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img