More
    Homeमार्केटिंगरोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना युवकांसाठी सुवर्णसंधी - 'या'कंपनीकडून ५ लाख नोकऱ्या उपलब्ध

    रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना युवकांसाठी सुवर्णसंधी – ‘या’कंपनीकडून ५ लाख नोकऱ्या उपलब्ध

    बेरोजगार आहात ? कामाच्या शोधात आहे त्यांना रोजगार मिळणार आहे .युवकांसाठी एका कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत आहे कि नाही आनंदाची बातमी ! आता तुम्ही म्हणाल जिथे बऱ्याच कंपन्या कामगार कपाती करत आहेत तिथे नोकरी कोण देणार पण अशी एक कंपनी आहे ती चक्क ५ लाख नोकऱ्या उपलब्ध देणार आहे

    ॲपल भारतात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. आयफोन निर्मिती ॲपल कंपनीमध्ये लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात ॲपल कंपनीमध्ये पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.तब्बल पाच लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याने भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. आठवडाभरापूर्वी ॲपल कंपनीने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केल्याप्रकरणी काढून टाकले होते. मात्र आता ॲपल कंपनी भारतात अधिक गुंतवणूक करुन आपलं उत्पादन झपाट्याने वाढवणार असल्याचा विचार करत आहे. कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संदर्भाने हालचीलांना देखील वेग आला आहे.ज्या युवकांना ॲपल कंपनीमध्ये काम करायचे आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

    आयफोन उत्पादनात २५ टक्के वाढ होण्याची शक्यता
    मिळालेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनी पुढील तीन वर्षात भारतात पाच लाख नोकऱ्या देणार आहे. यामुळे ॲपल कंपनी संबधीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत तीन पटीने वढ होणार आहे. तर या निर्णयामुळे अप्रत्यक्ष रोजगारातही वाढ होणार असल्याचे कळते. सध्या जगातील एकूण आयफोन उत्पादनापैकी ७ आयफोन हे भारतात तयार होतात. २०३० पर्यंत याची संख्या २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही तरुणांसाठी मोठी संधी असणार आहे. देशात स्थानिक मूल्यवर्धन १५ ते १८टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे. दरम्यान, सध्याच्या काळात भारतात आयफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.

    ॲपल कंपनी भारतात आपलं उत्पादन झपाट्यानं वाढवणार
    विशेष म्हणजे ॲपल कंपनीमध्ये भारतात या पाच लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळं देशातील युवकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. यामुळं भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. ॲपल कंपनी भारतात आपलं उत्पादन झपाट्यानं वाढवणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संदर्भानं हालचीलांना देखील वेग आलाय.

    जाणून घेऊया ॲपल कंपनी बदल
    या चाळीस वर्षे जुन्या कंपनी बद्दल आजही अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत. ह्या कंपनीच्या नावाला कोणत्याही प्रस्तावनेची गरज नाही. Apple Inc. ही जगातील सर्वात जास्त नावारूपाला आलेली आणि सर्वात धनवान कंपनी आहे. अमेरिकेच्या कोषागारात नसेल इतकी चलनी संपत्ती या कंपनीकडे आहे. आयफोन, आयपॅड, आणि मॅक पीसी हे प्रत्येक विज्ञानप्रेमी व्यक्तीचे आकर्षण आहे. ॲपलची उत्पादने , त्यांचे डिझायनिंग आणि कार्यक्षमता यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. ॲपल या ब्रॅन्डची ‘ आय ‘ उत्पादने , त्यांनी बाजारामध्ये सर्वप्रथम आणलेल्या आय मॅक पासून सुरु झाली. या कंपनीचे जनक आणि तत्कालीन सी इ ओ स्टीवी जॉब्स यांनी , ॲपलच्या ” आय ” उत्पादनांमधील ‘ आय ‘( i ) हा इंटरनेटसाठी असल्याचे म्हटले.

           

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img