More
    Homeमनोरंजनअल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' रिलीज होण्यापूर्वीच बनला 'फायर'

    अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ रिलीज होण्यापूर्वीच बनला ‘फायर’


    २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला पुष्पा द राइज हा चित्रपट चांगलाच गाजला होता.. हा वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता . चित्रपट संपूर्ण भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला असतानाच देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. मात्र तेव्हापासूनच पुष्पा सीक्वेलची प्रेषक आतुरतेने वाट पाहत आहेत . सध्या ‘पुष्पा-२’ ) या चित्रपटाचे चित्रीकरण जोमाने सुरू असून १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) वाढदिवसाच्या निमित्ताने ‘पुष्पा-२’ मधील त्याचा टीझर लाँच करण्यात आला. देशात ५ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि मायथ्री मूव्ही मेकर्स निर्मित, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल प्रमुख भूमिकेत आहेत.


    तसेच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये पुष्पा एका वेगळ्या अवतारात साडी नेसून शत्रूंशी लढताना दिसत आहे. हा टीझर यूट्यूबवर दोन तासांत ३५ लाख लोकांनी पाहिला.साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ४२ व्या वाढदिवसादिवशी ८ एप्रिल रोजी निर्मात्यांनी हा टीझर रिलीज केला आहे.सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट आहे . १ मिनिट ८ सेकंदाच्या या टीझरमध्ये पुष्पाचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. टीझरच्या सुरुवातीला तो माँ कालीच्या पूजा पंडालमध्ये काजल लावताना, झुमके घालताना आणि घुंगरू बांधताना दिसला. यानंतर, तो हातात त्रिशूळ फिरवतो आणि शत्रूच्या छातीवर चढतो. शेवटी साडीचा पल्लू दाबून तो शत्रूंशी लढताना दिसला.

    रिलीज आधीच कमाई 
    या चित्रपटावर प्रचंड खर्च करण्यात येत असून जवळपास ५०० कोटींचे बजेट असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जगभरातील संगीताचे हक्क आणि हिंदी सॅटेलाइट हक्क टी-सीरीजला ६० कोटी रुपयांना विकले आहेत. ‘स्टार मां’ या वाहिनीने तेलुगू सॅटेलाइट राइट्सही विकत घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही डील किती रुपयांमध्ये झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या चित्रपटाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. ६ मिनिटाच्या सीनसाठी ६० कोटींचा खर्च गंगाम्मा जत्रा आणि त्यातील संघर्ष हा सहा मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे ६० कोटी रुपये खर्च केले असून आणि सीन पूर्ण करण्यासाठी ३० दिवस लागले. 


    पुष्पा 2’च्या ओटीटी रिलीजची डील
    थिएटरमध्ये चित्रपट रिलीज होण्याआधीच ओटीटी रिलीजबाबत डील झाल्याची जोरात चर्चा सुरू आहे. पुष्पा २ च्या निर्मात्यांनी ओटीटी रिलीजसाठी नेटफ्लिक्ससोबत करार केला असल्याची चर्चा सुरू आहे. ही डील १००कोटींना झाली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे मोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच रिलीजपूर्वी ‘पुष्पा २’ ने १६० कोटींची कमाई केली असल्याचे म्हटले जात आहे.

     रिलीजपूर्वी ‘पुष्पा 2’ ने 160 कोटींची कमाई केली असल्याचे म्हटले जात आहे.भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २ ‘चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img