More
    Homeराजकारणसांगली दौरादरम्यान देवेंद्र फडणवीस संभाजी भिडे यांची कानात कुजबुज ! या भेटीची सध्या...

    सांगली दौरादरम्यान देवेंद्र फडणवीस संभाजी भिडे यांची कानात कुजबुज ! या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा .. नेमका काय दिला कानमंत्र!

      लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या ठिकठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत .देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते हेलिकॉप्टराने ते कवलापूर विमानतळावर दाखल झाले. तेव्हा सांगलीच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी कवलापूर विमानतळावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे देखील उपस्थित होते. ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची वाट पाहत होते. देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर संभाजी भिडे त्यांना भेटले. यानंतर संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून त्यांना काहीतरी सांगत होते. यानंतर देवेंद्र फडणवीस किंचित खाली झुकले आणि संभाजी भिडे यांनी त्यांच्या कानात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.ज्यानंतर देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी होकारार्थी मान डोलवली. या कृतीची चर्चा सांगलीत चांगलीच रंगली आहे.या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओ पाहून या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, सांगली लोकसभेच्या दृष्टीने या दोघांमध्ये काही चर्चा झाली असावी का, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
    शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थानचे संस्थापक संभाजी भिडे देवेंद्र फडणवीस यांना काही कानमंत्र देण्यासाठीच त्यांचा भेटीसाठी त्यांची वाट पाहत होते का असा प्रश्न उपस्थित होतो.

    संभाजी भिडे यांनी नेहमी वादग्रस्त विधाने करून आपली झाप पडली आहे . बेधडक ,वादग्रस्त असे व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी भिडे .. जन्मापासूनच शिवछत्रपतींच्या विचारांचे पाईक… महाराष्ट्रातल्या लाखो शिवप्रेमींचं श्रद्धास्थान..असे मनोहर असं मूळ नाव असलेले भिडे सांगलीतल रहिवाशी आहेत. सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांच मूळ गाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. संभाजी भिडे १९८०  च्या दशकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. संघाशी वाद झाल्यानंतर संभाजी भिडे यांनी सांगलीमध्ये १९८४ मध्ये श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली. कट्टर हिंदुत्ववादी असणारे संभाजी भिडे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास सांगतात .हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे तसेच त्याच्या शिवप्रतिष्ठानने रायगडावर 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे.
    तसेच संभाजी भिडे हे त्यांच्या अनेक वक्तव्य आणि कृतींमुळे चर्चेत असतात.अनेक वादग्रस्त विधाने करून भिडे यांनी निडरपणे आपले मत व्यक्त केले आहेत आणि चर्चेचा विषय बनले आहेत .

    पाहुयात भिडेचें वादग्रस्त विधाने

    संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते . केवळ गांधीजीच नव्हे तर महात्मा फुले आणि साईबाबांबा बाबतीत  भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते  ,देश उभारण्याची ताकत मिळायची असेल,तर हिंदुस्थानाच्या १२३ कोटी लोकांचे रक्त गट बदलला पाहिजे आणि तो छत्रपती शिवाजी – संभाजीचं केला पाहिजे, असं विधान भिडे यांनी केले होतं.तसेच देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधी बाधा झाली आहे,असं विधानही भिडे गुरुजी यांनी केलं होतं. अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झाले,’ असं वक्तव्य केलं होतं.तसेच  १  जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात भिडे यांचं नाव चर्चेत आलं होत .मिरजमध्ये उफाळलेल्या दंगलीमध्ये सक्रीय भाग घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता एका महिला पत्रकाराला म्हटले की, ‘आधी टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलतो.असे वक्तव्य करून वादात सापडले होते . जून  २०१७  मध्ये पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोप भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला होता . २००९ मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर काही संघटनांनी ‘जोधा अकबर’ या सिनेमाला विरोध केला होता. त्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा या भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला . असे वादग्रस्त व्यक्तीमत्व असणारे भिडे हे त्यांची मते नेहमीच बेधडकपणे मांडत आले आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजी भिडेचें केलेलं कौतुक
    २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी संभाजी भिडे यांची भेट रायगड किल्ल्यावर झाली होती . त्यावेळी पंतप्रधानांनी संभाजी भिडे यांचं कौतुक केलं होते .पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी भिडे गुरुजींचा आभारी आहे की त्यांनी मला निमंत्रण न देता आदेश दिला. गेली अनेक वर्षं मी भिडे गुरुजींना ओळखतो. आम्ही जेव्हा सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं तेव्हा आम्हाला भिडे गुरुजींचं उदाहरण दिलं जायचं. ते म्हणाले होते, “जर कोणी बसमध्ये किंवा रेल्वेच्या डब्यात भिडे गुरुजींना भेटलं, तर त्या व्यक्तीला कल्पनाही येणार नाही की ही व्यक्ती एक तपस्वी, एक महापुरुष आहे.फेब्रुवारी २०१८ मध्ये नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त एक व्हीडिओ ट्वीट करून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं होतं. त्या व्हीडिओच्या शेवटी मोदींचा संभाजी भिडेंसोबतचा एक फोटो होता. भीमा कोरेगावप्रकरणी आरोप असताना पंतप्रधान हा फोटो कसा ट्वीट करू शकतात, असा त्यावरून वाद झाला होता.


    सांगलीत संजयकाका पाटलांना मतदान करण्याचे आवाहन
    सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी संजयकाका पाटील यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत संजयकाका पाटील यांची हॅटट्रिक पक्की असल्याचे म्हटले आहे .संजय काका पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आमच्याकडेही पैलवान आहेत. विरोधकांमध्ये सगळी इंजिनं आहेत, आमच्याकडे सगळे डबे आहेत. इंजिनांमध्ये ताळमेळ नसल्याने ती हलत नाहीत. संजयकाका पाटील यांचा विजय पक्का आहे, आता ते किती मोठ्या मताधिक्याने विजय मिळवतात, हे बघायचं आहे. पुढील पाच वर्षे कोणाच्या हातात देश द्यायचा,यासाठी ही निवडणूक आहे. संजय काका मोदींच्या इंजिनच्या डब्यासोबत सर्वांना दिल्लीला घेऊन चालले आहेत, आपली विकासाची गाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. विरोधकांच्या गाडीला मात्र इंजिनच नाही.
    देवेंद्र फडणवीस कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्याचप्रमाणे संभाजी भिडे देखील कट्टर हिंदुत्ववादी आहेत . त्यांचामध्ये अश्या अनेकदा गाठीभेटी होत असतात . मात्र सांगलीत देवेंद्र फडणवीसांचा हात धरून भिडेंनी त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर फडणवीसांनी देखील भिडेंशी कानगोष्टी केल्या आता हि भेट राजकीय आहे कि स्वेच्छने आहे हे अजून गुलदस्ताच आहे .

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img