More
    Homeराजकारणहजारो गरीब रूग्णांच्या जीवनात निरामय प्रकाश आणणारे देवाभाऊ!

    हजारो गरीब रूग्णांच्या जीवनात निरामय प्रकाश आणणारे देवाभाऊ!

    देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. भारतीय जनता पार्टीचीही  या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक ठिकाणी सभांसाठी उपस्थिती दर्शविताना दिसतात. रामनवमीच्या दिवशी फडणवीस रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी नागपूरला निघाले असताना त्यांना वाटेत एका टेकडीजवळील मंदिराजवळ एक ६५ वर्षीय आजोबा जखमी अवस्थेत दिसले.  त्यांनी लगेच गाडी थांबवून त्या आजोबांना तातडीने अॅम्ब्युलेन्स बोलावून उपचाराकरिता रुग्णालयात पाठवून ते पुढील प्रवासाला निघाले. 

    एक निडर, तल्लख बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि लोकप्रियतेचा मिलाफ साधणारे, जनसंपर्क साधणारे, व्यासंगीअसे महाराष्ट्रातील सक्षम आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व असणारे देवेंद्र फडणवीस… त्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक हळुवार व संवेदनशील बाजूही आहे. सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंता त्यांना समजतात व ते जनतेच्या  समस्या आस्थेवाईकपणे ऐकून घेतात. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत शिरून त्याच्या नजरेतून विचार करणे त्यांना जमते. सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्या वेदना समजून घेत त्याच्या समस्येवर तोडगा काढणे, हे त्यांचे कौशल्य आहे. जनतेबरोबर व्यवहार करताना त्यांचा हा पैलू दिसून येतो. याच सर्व बाबींमधून देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता अधोरेखित होते. 

    देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. गरीब रुग्णांना तांत्रिक कारणाने राजीव गांधी व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याने उपचार घेता येत नव्हते. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीद्वारे मदतीची प्रक्रिया सुरु केली.  मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये ६१४ कोटींची वाढ केली. याद्वारे ६३ हजार ५७३ रुग्ण नागरिकांना ५९८.३२ कोटींची मदत करण्यात आली. राज्यातील गरीब व गरजू रुग्ण केवळ पैशांअभावी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नयेत, यासाठी विविध आजारांनी ग्रासलेल्या ५६ हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून ५५० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. या मदतीमुळे रुग्णांबरोबरच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना दिलासा मिळाला. १ नोव्हेंबर २०१४ ते २० जून २०१९ या काळात ५६ हजार ३१८ रुग्णांना ५५३ कोटी ९२ लाख १९ हजार ५९८ रुपयांची मदत करण्यात आली. वैद्यकीय शिबिरांमधील रुग्णांचा समावेश केल्यामुळे २०१८-१९ मध्ये १० हजार ५८२ एवढ्या लक्षणीय रुग्णांना १ हजार कोटींहून अधिक सहाय्य दिले गेले. कॅन्सरच्या उपचारासाठी सर्वाधिक म्हणजे ८ हजार ४६८ रुग्णांना सुमारे ९० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. 

    मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातही हे कार्यालय सुरू केले. त्यामुळे विदर्भासह जवळपासच्या रुग्णांना मुंबईत चकरा न मारता नागपुरात मदतीसाठी अर्ज करणे शक्य झाले. फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून हृदयरोग रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेसाठी दीड लाख, एन्जिओप्लास्टीसाठी १ ते १.३० लाख रुपये, कर्करोगग्रस्तांना ७५ हजार ते १ लाख, अस्थिरोगाच्या रुग्णांच्या खुबा व गुढघे प्रत्यारोपणासाठी ७५ हजार ते १ लाख व इतर आजारांसाठीही मदत दिली जात होती. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर प्रति रुग्ण मदतीची रक्कम खूपच कमी झाली. यावेळी हृदय रुग्ण, कर्करुग्ण, खुबा व गुढघे प्रत्यारोपणाच्या रुग्णांना केवळ ३० ते ५० हजारांपर्यंतच मदत मिळाली. 

    देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला. तसेच मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर गरीब रुग्णांसाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची स्थापना देखील केली. 

    इतकेच नाही तर लोकांच्या अडचणीत देवाभाऊ नेहमी मदत करण्यास सक्रिय असतात. मग पूरग्रस्त ठिकाणी लोकांना तातडीची मदत करणे असो, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे असो, वायरल विरली मोदीच्या एका ट्विटवर तिला मदत करणे असो, कोरोनाच्या काळात देखील देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गरजूंची मदत केली आहे. जनतेच्या सुखात सहभागी होतानाच दुःखातही तातडीने मदत करणारे देवाभाऊ…

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img