More
    Homeराजकारणताई विरुद्ध वहिनी! कोण जिंकणार बारामती?

    ताई विरुद्ध वहिनी! कोण जिंकणार बारामती?

    शरद पवार (Sharad pawar) हे अत्यंत बेरकी राजकारणी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी अनेकांना कात्रजचा घाट दाखवला. अनेकांची घरे देखील फोडली, असा त्यांच्यावर कायमच आरोप होत असतो. मात्र उतार वयात नियतीने पुतण्याच्या रूपाने पवारांवर चांगलाच आघात केलेला आहे. अजितदादांच्या बंडानंतर “हा तर साहेबांचाच मास्टर स्ट्रोक”, असा नॅरेटिव्ह अनेक पत्रकारांनी उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दादांनी बारामती (Baramati) लोकसभेच्या जागेवर आपल्या सुविद्य पत्नी ‘सुनेत्रा पवार’ (sunetra pawar) यांना उतरवल्याने अनेकांची भंबेरी उडाली. तर दादांच्या या तिरप्या चालीने सुप्रियाताईंची झोप उडाली असणार यात संशय नाही. कारण सुप्रियाताईंसाठी आता बारामतीचे मैदान जिंकणे वाटते तितके सोपे राहिलेले नाही. म्हणूनच बारामती लोकसभेत किसका लोहा भारी जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून.     

     खानदानी माहेर आणि अजितदादांची सुविद्य पत्नी, या पलीकडच्या सुनेत्रावहिनी  

    उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची सुविद्य पत्नी आणि खानदानी ९६ कुळी मराठा घराण्यातील पाटील कुटुंबातली मुलगी. यापलीकडे सुनेत्रा पवार यांची स्वतःची ओळख आहे. मात्र सुनेत्रावहिनी कायमच प्रकाश झोतापासून लांब राहणं पसंत करतात. गुगल या सर्च इंजिनवर त्यांचे फोटो शोधल्यास अजितदादांच्या बाजूला बसलेल्या किंवा पदर सावरून उभ्या असलेल्या सुनेत्रावहिनी दिसतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल कि सुनेत्रा पवारांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 मध्ये धाराशिवमधील ‘तेर’ या गावामध्ये झालाय. सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांच्या वडिलांचं नाव बाजीराव भगवंतराव पाटील तर आईचे नाव दौपदी बाजीराव पाटील आहे. बी. कॉम पर्यंत वाहिनीचं शिक्षण पूर्ण झालेले असून त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. वहिनींना वाचन, निसर्ग फोटोग्राफी, चित्रकला आणि समाजकार्यामध्ये विशेष आवड आहे. 

    फारश्या प्रकाश झोतात न येणाऱ्या सुनेत्रा वहिनींचे सामाजिक कार्य 

    सुनेत्र पवार(sunetra pawar) या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया (एनजीओ) बारामतीच्या अध्यक्ष आहेत. त्यासोबतच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. 

    सोबतच आरोग्य क्षेत्रात देखील त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे.  

    सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांचं आरोग्य क्षेत्रामध्येही योगदान असून यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, कर्करोग जनजागृती तसेच मासिका जागर अभियान, महिलांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे आयोजन त्यांनी केलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्या प्रतिष्ठान तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं आहे. विज्ञान प्रदर्शन आणि जत्रांच्या माध्यमातून मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन दिलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 23 वर्षापासून समाजाच्या विविध क्षेत्रात सातत्याने कार्यस्त आहेत. काटेवाडी गावात त्यांचं सन 2000 पासून सामाजिक कार्य सुरु आहे. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सुनेत्रा पवारांनी सातत्याने काम केलं आहे.

    पुरस्कार 

    सुनेत्रा वहिनींची सामाजिक बांधिलकी आणि उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. चिंचवड देवस्थान तर्फे ‘श्रीमत् महासाधू श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार 2021’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार 2023’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार पुणे. लोकमत तर्फे ‘आऊटस्टँडींग वुमन अॅवार्ड’ आणि ‘लोकमत आयकॉन पुरस्कार, पुणे. तर ग्रामीण भागात जागरूकता निर्माण केल्याबद्दल ईटी जेन नेक्स्ट आयकॉन्स पुरस्कार आणि राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2024 असे पुरस्कार मिळाले आहेत.

    नणंद कि भावजय? बारामतीचा कौल कुणीकडे? 

    जेष्ठ नेते केशवराव जेधे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे १९६० च्या बारामती लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने केशवरावांचे चिरंजीव गुलाबराव जेधे याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर शेकाप,डावे,समाजवादी यांनी शरद पवारांचे बंधू ऍडव्होकेट वसंतराव पवारांना पोट निवडणुकीसाठी तिकीट दिल. त्यावेळी शरद पवारांनी आपल्या सख्या भावा विरोधात प्रचार करून पाडले. ज्याचे बक्षीस शरद पवारांनी पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि ६७ साली आमदारकी देऊन देण्यात आले, असे म्हंटले जाते. बारामती मतदार संघावर मुख्यत्वे 1991 सालापासून पवार कुटुंबाचा वर चष्मा आहे. अजित पवार (Ajit pawar) या मतदारसंघातून साडेतीन लाखांच्या आघाडीने निवडून आले होते. त्यानंतर खुद्द शरद पवारांनी ९१,९६,९८,९९,२००४ इतका कालावधी खासदारकी भूषवलेले आहे. तर त्यानंतर २००९ ते २०१९ तब्ब्ल तीन वर्षे सुप्रियाताई सुळे इथल्या खासदार आहेत. मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ताईंविरोधात महादेव जानकर रिंगणात उतरले होते आणि ताईंना केवळ ६९ हजार ७१९ मतांनी विजय मिळाला होता. या विजयानंतर जानकर म्हणाले होते कि, “मोदीसाहेबांनी बारामतीमध्ये फक्त एक सभा घायला हवी होती. मी सुप्रियाताईंचा पराभव केला असता”. असे राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक म्हणतात.

    सुप्रिया ताई बारामतीच्या तीन टर्म खासदार आहेत. पण या पंधरा वर्षातील त्यांची स्वतःची अशी पाच विधायक कामे दाखवा. संसद महारत्न पुरस्कार हे खासगी संस्थेकडून दिले जातात. त्यामुळे त्याचा ग्राउंडवरील मतांवर फारसा फरक पडत नाही. शिवाय बारामती मतदार संघात राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचे दोन आमदार आहेत. त्यात भाजपला महाराष्ट्रातून लोकसभेवर जास्तीत जास्त खासदार पाठवायचेत. तर आपल्याला लोकसभा निवडणुकीत मिठाचा खडा लागल्यास वेगळा विचार करण्यात येईल अशी जाहीर तंबी अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा ताईंच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात. कुठलीही निवडणूक जिंकण्यात बूथचा खूप मोठा वाटा असतो. अजितदादा विशेषतः भाजपचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे निवडणूक बूथची यंत्रणा खूपच स्टँग आहे. त्यामुळे सध्यातरी बारामतीत सुनेत्राताईंची पर्यायाने अजितदादांची ताकद जास्त असल्याचे दिसून येते. 

    – एन. कोर्डे  

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img