More
    Homeराजकारणमराठा समाजासंदर्भात मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मराठा समाजासंदर्भात मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मराठा समाजासाठी मी काय काम केले हे मराठा समाजाला चांगलच माहिती आहे. मराठा समाजासाठी सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजाकरिता आशेचं स्थान आहे. त्याची सुरुवात मी केली आहे. त्यांच्या सगळ्या योजनांची सुरुवात देखील मी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या सगळ्या योजना सुदृढ केल्या, त्या योजनामध्ये वाढ केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

    मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात देखील टिकवले. माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत जे लोक आले होते, त्यांना जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी नीट सांभाळली नाही. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात ही लोक कमी पडले. नंतर आलेल्या आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आले नाही.

    कोणाच्या म्हण्याने मराठा समाज त्या गोष्टींवर विश्वास ठेवेल असं माननार्‍यापैकी मी नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. जी स्क्रिप्ट आजपर्यंत उद्धव ठाकरे ,पवार बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेनी का मांडावे असा सवाल उपस्थित करत जरांगेच्या पाठीशी कोण आहे, काय आहे याची कल्पना आमच्याकडे आहे. योग्यवेळी ते बाहेर येईल. कायदा व सुव्यवस्था न बिघडवता कुणीही आंदोलन केले तरी आमची काहीच हरकत नाही मात्र कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले नाही तर पोलिसांना योग्य ती कारवाई करावीच लागेल असे राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजासंदर्भात मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img