More
    Homeवैशिष्ट्यपूर्णपाकिस्तानी क्रिकेटपटूने मोदी शाहांचे आभार का मानले?

    पाकिस्तानी क्रिकेटपटूने मोदी शाहांचे आभार का मानले?

    पाकिस्तान आणि भारताचे शत्रुत्वाचे नाते जगजाहीर आहे. अगदी क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा या दोन्ही संघांच्या एकमेकांना भिडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. जावेद मियांदाद-किरण मोरे,व्यंकटेश प्रसाद-आमेर सोहेल, गौतम गंभीर-शाहिद आफ्रिदी,हरभजन सिंग-शोएब अख्तर अशी अनेक उदाहरणे आहेत. पाकिस्तानी खेळाडूंनी अनेकदा भारतविरोधी गरळ सुद्धा ओकली. मात्र आता त्याच पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने हिंदुस्थानात सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले.

    काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा ?

    Citizenship Amendment Act ज्याला मराठी मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा असे म्हणतात. याच CAA कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा भारत सरकारने केली आहे. या अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणे सोपे होणार आहे. यावरून भारतात विरोधकांनी सत्ताधारी भाजप विरोधात राजकारण तापवले आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने भारत सरकारने सीएए लागू केल्याचे समर्थन करून मोदी-शाह यांचे आभार मानले. डिसेंबर 2019 मध्ये मोदी सरकारने संसदेत CAA मंजूर केला होता. या कायद्यानुसार, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या अत्याचारग्रस्त गैर-मुस्लिम स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) सरकार भारतीय नागरिकत्व देईल. या देशांमध्ये हे समुदाय अल्पसंख्याक आहेत. तथापि, 1 जानेवारी 2015 पूर्वी भारतात आलेल्या स्थलांतरित आणि निर्वासितांनाच हा लाभ मिळेल. अशातच पाकिस्तानचा हिंदू क्रिकेटर दानिश कनेरियाने कायद्याच्या अंमलबजावणीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    आपल्या X खात्यावर पोस्ट करत दानिशने लिहिले कि,
    ‘पाकिस्तानातील हिंदूंना आता मोकळ्या हवेत श्वास घेता येणार आहे. ‘दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार देखील मानले आहेत. त्यांनी लिहिले पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया नेहमीच नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारचे समर्थन करत असतो

    कोण आहे दानिश कनेरिया?

    दानिश कनेरिया हा पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात अनिल दलपतनंतर दुसरा हिंदू क्रिकेटपटू आहे. तो 2000 ते 2010 पर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळला आहे. वसीम अक्रमनंतर सर्वाधिक विकेट घेणारा कनेरिया हा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज आहे. कनेरियाने पाकिस्तानसाठी 60 हून अधिक कसोटी सामने आणि सुमारे 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा पाकिस्तानचा फिरकीपटू म्हणून कनेरियाला ओळखले जाते. दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी आणि 18 वन डे सामने खेळले आहेत. दानिश कनेरिया याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तान सरकार आणि तेथील प्रशासनाच्या कामावर परखड टीका केली आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील भेदभावावर भाष्य केले आहे.त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर देखील गंभीर आरोप केले होते. 2010 मध्ये 43 वर्षीय कनेरियावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. मात्र नंतर पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली. यानंतर त्याला पाकिस्तान संघात स्थान मिळाले पण त्याला मालिकेत खेळण्यापासून रोखण्यात आले.अलीकडेच पार पडलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देखील दानिश कनेरिया सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होत होता. आता CAA बद्दलची त्याची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

    पाकिस्तानात हिंदूंचे सक्तीचे धर्मपरिवर्तन. हिंदू मुलींला जबरदस्तीने पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पडण्याची अनेक उदाहरणे उजेडात आली आहेत. शिवाय जगभरात हिंदू,शीख,जैन बुद्ध धर्मियांना हक्काने आश्रय घेता येईल असा एकही देश नाही. सीएएमुळे अशांना भारतात आश्रय घेता येण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. म्हणूनच दानिशने याचे समर्थन केले असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img