More
    Homeवैशिष्ट्यपूर्णसमृद्धी महामार्गाच्या तिसर्‍या टप्प्याचे लोकार्पन संपन्न

    समृद्धी महामार्गाच्या तिसर्‍या टप्प्याचे लोकार्पन संपन्न

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी ‘समृद्धी महामार्गा’ची संकल्पना
    प्रत्यक्षात साकारली

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकरण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील तिसर्‍या भरवीर ते इगतपुरी या तिसर्‍या टप्प्याचे लोकार्पन आज मंत्री  दादा भुसे यांच्या हस्ते होत आहे.या महामार्गाचे काम वेगाने सुरु असून जुलै महिन्याच्या अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.यामुळे नाशिक महामार्गावर भिवंडी ते इगतपुरी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.त्याच सोबत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणार्‍या साई भक्तांचा वेळ वाचणार असून इगतपुरी पासून शिर्डीला 1 तासात पोहचता येणार आहे.

    मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.त्याच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील दळणवळणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी आणि सतत नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या दृष्टिकोनातून जन्माला आलेली ‘समृद्धी महामार्गा’ची संकल्पना प्रत्यक्षात साकारत आहे.701कि मी चा हा समृद्धी महामार्ग राज्यातील 15 जिल्हे आणि हजारो गावांना परस्परांशी आणि राजधानी मुंबईशी जोडणार आहे.

    हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच वेगवेगळ्या कारणामुळे समृद्धी महामार्ग प्रकल्पाला विरोध होत होता.देवेंद्र फडणवीसांनी  संयमीपणे या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यात यश मिळवून समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रियाही शांततेत पार पाडली. या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर या राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील अंतर 112 किमींनी कमी होणार आहे.मुंबई आणि नागपूरमधील प्रवास 8 तासांत करणे शक्य होणार आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा हा मार्ग,कृषी आणि व्यापाराच्या बाबतीत मुंबई आणि विदर्भाला जोडणारा मोठा दुवा ठरणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img