More
    Homeवैशिष्ट्यपूर्णस्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 400 कोटी रुपये

    स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 400 कोटी रुपये

    मुंबई-स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात 400 कोटी रुपये दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि इतर नेत्यांनी,आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन,मुंबई येथे भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत.राज्यातील युती सरकार हे राज्यातील सर्व घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना या मोठ्या प्रमाणात राबवुन त्याची अंमलबाजावणी देखील तत्परतेने करत आहे.

    मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने सारथी सारखी योजना सुरु केली.या योजनेच्या माध्यामातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध सवलती देण्यात येत आहेत. तरुणांना शिक्षण मराठा समाजासाठी विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून वार्षिक 60 हजार रुपये निर्वाह भत्ता सुरु करण्यात आला आहे.सर्व जिल्ह्यात 100 मुलांचे वसतिगृह सुरु करण्यात येत आहेत.त्याच प्रमाणे परदेशी उच्च शिक्षणासाठीही शिष्यवृत्ती तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 50 हजार रुपये देण्यात येत आहेत.

    महामंडळाकडून मराठा समाजासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.यामध्ये वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजना ,गटकर्ज  व्याज परतावा योजना,राजर्षि छत्रपती शाहू महाराज शैक्षनिक शुल्क प्रतिपूर्ति योजना आदी विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.सारथी योजनेअंतर्गत मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना ,ओबीसी विद्यार्थ्याप्रमाणे सर्व खाजगी महाविद्यालयात 504 अभ्यासक्रमामध्ये अर्ध्या फी ची प्रतिपूर्ति करण्यात आली आहे.कायद्याच्या कसोटीत यशस्वी होणारे मराठा समाजाचे हक्काचे स्वतंत्र 10% टक्के आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img